करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण (ITI Admission 2024) संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) कडून आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सोमवार दि. 3 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन DVET प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
10 वी निकाल जाहीर झाल्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. काही दिवसापूर्वी (ITI Admission 2024) दहावीचा निकाल जाहीर झाला असून आता ITI प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
ITI प्रवेशाचे वेळापत्रक – (ITI Admission 2024)
1. दि. 3 जून ते दि. 30 जून पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
2. दि. 5 जून ते दि. 1 जुलै या कालावधीत प्रवेश अर्ज निश्चित करता येईल.
3. दि. 5 जून ते 2 जुलै पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे.
4. दि. 4 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
5. दि. 4 ते 5 जुलै या कालावधीत गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवल्या जातील.
6. दि. 7 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
7. दि. 14 जुलै रोजी पहिली प्रवेश फेरी होईल.
8. दि. 15 ते 19 जुलै रोजी दुसरी प्रवेश फेरी होईल.
9. दि. 28 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी तिसरी प्रवेश फेरी होईल.
10. दि. 26 ऑगस्ट रोजी संस्थास्तरावर समुपदेश फेरी पार पडेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com