करिअरनामा ऑनलाईन । मुलींना आर्थिक अडचणींमुळे इच्छा (PM Vidya Lakshmi Yojna 2024) असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. यावर तोडगा काढत केंद्र सरकारने ‘पीएम विद्या लक्ष्मी योजना’ सुरु केली आहे. ही योजना फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही फायद्याची आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याचं शिक्षण आर्थिक अडचणीशिवाय व्हावं. जर तुमचीही अशीच भावना असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेवू शकता. बोर्डाची परीक्षा चांगल्या पास झाल्यानंतर मुलीच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला बँकेकडून साडे 7 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
‘पीएम विद्या लक्ष्मी योजना 2024’
सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला शिक्षणासाठी बँकेकडून साडे 7 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला 15 लाख (PM Vidya Lakshmi Yojna 2024) रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळेल. तुम्हाला पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती आणि एज्युकेशन लोनशी संबंधित सर्व माहिती vidyalakshmi.co.in/Students/ याठिकाणी मिळेल. तुम्ही इथे ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.
असा करा अर्ज (Education) –
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थिनीच्या नावाची नोंदणी vidyalakshmi.co.in/Students/ विद्या लक्ष्मी पोर्टलवर करा आणि लॉग इन करा.
2. सर्व आवश्यक डिटेल्स भरून Common Education Loan Application (CELAF) भरावे लागेल.
3. CELAF हा एकच फॉर्म आहे जो तुम्ही अनेक बँका आणि योजनांमध्ये एज्युकेशन लोनसाठी अर्ज करण्यासाठी भरू शकता.
4. हा फॉर्म इंडियन बँक्स असोसिएशनकडून जारी केला जातो. सर्व बँका हा अर्ज स्वीकारतात.
5. फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार एज्युकेशन लोन सर्च करा आणि तुमच्या गरजा, पात्रता आणि सोयीनुसार अर्ज करू शकता.
6. विद्या लक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थी CELAFच्या माध्यमातून जास्तीत जास्त तीन बँकांमध्ये अर्ज करू शकतात.
7. या योजनेत 13 बँका कव्हर होतात आणि 22 प्रकारची एज्युकेशन लोनही दिली जातात.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा व्होटर आयडी, पॅन कार्ड व्यतिरिक्त पासपोर्ट साइज फोटो, तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आधार, व्होटर आयडी किंवा वीज बिल या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
2. याशिवाय आई-वडिलांच्या (PM Vidya Lakshmi Yojna 2024) उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे.
3. यासह हायस्कूल आणि इंटरच्या मार्कशीटच्या फोटोकॉपी द्याव्या लागतील.
4. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या संस्थेत मुलगी शिक्षणासाठी जाणार आहे तिथलं ॲडमिशन कार्ड आणि सर्व प्रकारच्या खर्चाची माहिती तुम्हाला द्यावी लागेल, तसेच हा कोर्स किती कालावधीसाठी आहे हेही तुम्हाला सांगावं लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com