10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे.

या वर्षी दहावीची परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या (10 th Board Results 2024) वेबसाइट्सव्यतिरिक्त, विद्यार्थी sscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in वर देखील निकाल पाहू शकतात. या वेबसाइट्सवर, विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि रोल कोड वापरून स्कोअरकार्ड तपासू शकतात.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2024 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण १० वी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहेत.

यंदा बारावीच्या निकालाप्रमाणे दहावी बोर्डाच्या (10 th Board Results 2024) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील अधिकृत वेबसाईटवरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रिंट विद्यार्थ्यांना घेता येईल. यासोबतच, Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका (Digital Marksheet) उपलब्ध करून देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी दुपारी 1 वाजता लिंक सक्रीय होणार
बोर्ड अधिकारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेद्वारे 10 वीचा निकाल जाहीर करतील, परंतु विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवरील निकालाची लिंक सोमवारी दुपारी 1 वाजता सक्रिय केली जाईल. यावर्षी राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार 10 वी चा निकाल –
1. mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://www.digilocker.gov.in/
5. http://results.targetpublications.org

SMS द्वारे असा पहा निकाल – (10 th Board Results 2024)
1. सर्व प्रथम तुमच्या मोबाइलमध्ये SMS अॅपवर जा.
2. Create New Message वर क्लीक करा.
3. तिथे MHSSC (स्पेस) सीट क्रमांक (उदा. A 789124) हे डिटेल्स भरा.
4. हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.
5. काही मिनिटांतच तुमच्या फोनवर निकालाचा तपशील येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com