करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL 2024) महाराष्ट्र राज्यात प्रथमच बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम (BBA/BCA/BMS/BBM )या अभ्यासकमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 4 व 5 मे या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा ही सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. सीईटी सेल तर्फे येत्या 27 ते 29 मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी (CET CELL 2024)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2024-25 या शैक्षणिक वर्षात बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम तसेच एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड अभ्यासक्रमास प्रवेश (CET CELL 2024) घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. अद्याप परीक्षेसाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com