करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NEET UG 2024) पूर्ण तयारी केली आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG परीक्षा 2024 साठी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांच्या हाती परीक्षेच्या तयारीसाठी थोडा अवधी शिल्लक आहे. NEET 2024 परीक्षा उद्या दि. ५ मे रोजी होणार आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर एनटीएनने आता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्या ड्रेस कोडमध्ये पोहोचावे लागेल याची माहिती देण्यात आली आहे; त्याबद्दल जाणून घेवूया…
विद्यार्थ्यांसाठी (मुले) असा आहे ड्रेस कोड (NEET UG 2024)
परीक्षा केंद्रावर येताना मुलांसाठी साधी पँट आणि हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट असा ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या पोशाखात झिप पॉकेट्स, मोठी बटणे, सेक्विन किंवा भरतकाम असलेले जड कपडे असू नयेत. विद्यार्थ्यांना फक्त हलके आणि साधे कपडे निवडण्याचा सल्ला दिला जातो.
विद्यार्थिनींसाठी (मुली) असा आहे ड्रेस कोड
विद्यार्थिनींना ब्रोच, फुले, बिल्ला किंवा जीन्स घालून परीक्षा केंद्रावर जाण्यास मनाई आहे. मुलींना कानातले, हेअरपिन, पेंडेंट किंवा नेकलेस इत्यादी सजावटीच्या वस्तू घालण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी हलक्या रंगाची डेनिम पॅन्ट आणि हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट असा ड्रेस कोड निवडू शकतात, ज्याची बटणे मोठी नसावीत. विद्यार्थिनींना कुर्ती, लेगिंग आणि प्लाझो पॅन्ट घालण्याची परवानगी नाही.
24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
यावर्षी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. NTA ने NEET मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड जारी केला आहे, जो परीक्षेत बसलेल्या (NEET UG 2024) सर्व विद्यार्थ्यांना पाळणे अनिवार्य असेल. तसे न केल्यास उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
एनटीएच्या म्हणण्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांना पारंपारिक ड्रेस घालायचा आहे, त्यांचा शोध घेतला जाईल. यासाठी परीक्षेच्या दिवशी दुपारी 12:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय न होता संपूर्ण शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. शीख उमेदवार परीक्षेदरम्यान पगडी, बांगडी घालू शकतात आणि कंगवा आणि किरपाण घेऊन परीक्षा हॉलमध्ये बसू शकतात. त्याचबरोबर मुस्लिम विद्यार्थिनी बुरखाही घालू शकतात.
परीक्षा केंद्रावर जाताना या वस्तू ठेवा सोबत
1. NEET 2024 परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना NEET UG प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
2. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी वैध फोटो ओळखपत्र (NEET UG 2024) सोबत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही.
3. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र म्हणून ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com