करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वीच्या निकालाची उत्सुकता (10th and 12th Result 2024) विद्यार्थ्यांसह पालकांना लागून राहिली आहे. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
उत्तर पत्रिका तपासणीचे काम वेगात
90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून 10वी आणि 12वी दोन्ही परीक्षांचा निकाल वेळेपूर्वी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाला संदर्भात सगळा आढावा (10th and 12th Result 2024) बोर्डाकडून वेळोवेळी घेतला जात आहे. याच आढाव्यावरुन निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी राज्यात दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तर इयत्ता बारावीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्तर पत्रिका तपासणीच्या कामाकडे बोर्डाचं लक्ष असून संबंधितांकडून रोज माहिती घेतली जात आहे.
गेल्या वर्षीच्या निकालाचा आढावा (10th and 12th Result 2024)
मागच्या वर्षी दहावीचा निकाल 2 जूनला जाहीर झाला होता. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला होता. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला होता. मागच्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला होता तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला होता. तर निकालात मुलींनी बाजी मारली होती.
इथे पाहता येईल निकाल
विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत (10th and 12th Result 2024) वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com