UGC NET 2024 : UGC NET परीक्षेत करण्यात आले ‘हे’ बदल; जाणून घ्या…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेबाबत एक महत्वाची (UGC NET 2024) बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. दि. 20 एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन अर्ज करायचा आहे.

परीक्षे संदर्भात करण्यात आले ‘हे’ बदल (UGC NET 2024)
महत्वाचे म्हणजे यावर्षीपासून परीक्षेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे उमेदवार 4 वर्षाच्या किंवा 8 सेमिस्टरच्या बॅचलर डिग्री प्रोग्रामच्या अंतिम सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील UGC NET जून 2024 सत्रासाठी अर्ज करू शकतात. आता उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विषयात पीएचडी करता येणार आहे. त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे, हे महत्त्वाचे ठरणार नाही. UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार म्हणाले; “4 वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम करत असलेले विद्यार्थी त्यांना ज्या विषयात 4 वर्षांची बॅचलर पदवी मिळाली आहे, त्या विषयात पीएचडी करू शकतात.”
याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी NTA च्या https://exams.nta.ac.in/ या नवीन वेबसाइटलाही भेट देऊ शकतात; अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली आहे.

पूर्वीचा नियम काय होता?
यापूर्वी UGC NET साठी पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य होते.
उमेदवार त्याच विषयात पीएचडी करू (UGC NET 2024) शकतात ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षांची पीजी पदवी केली आहे. मात्र नियमात दुरुस्ती केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यांना आता पदव्युत्तर पदवीची गरज भासणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com