Big News : ‘या’ शासकीय कर्मचाऱ्यांना पगारासह मिळणार ‘एवढे’ मानधन; शासनाचा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | एकीकडे देशभरात (Big News) लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा उडत असताना दुसरीकडे गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेटवस्तू देण्यात आली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. मात्र राज्यातील प्रत्येकच कर्मचाऱ्यांना हे वाढीव मानधन मिळणार नाही.

कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Big News) पेटला असताना सरकारने मराठा समाज मागासवर्गीय आहे की नाही या गोष्टीचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते. या सर्वेक्षणाच्या कामकाजाची जबाबदारी राज्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. परंतु सर्वेक्षणाचे काम हे अतिरिक्त कामकाज असल्यामुळे याचे अतिरिक्त मानधन देखील देण्यात यावे; अशी मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली होती. या मागणीनंतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन दिले जाईल; अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

या मागणी नंतरच राज्य सरकारने सर्वेक्षण केलेल्या (Big News) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त 10,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित परिपत्रक 2 एप्रिल रोजीच जारी करण्यात आले आहे. जारी झालेल्या परिपत्रकानुसार, प्रति पर्यवेक्षक रुपये 10,500/- तसेच प्रति प्रशिक्षक रुपये 10,000/- इतके मानधन संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच मराठा आरक्षणासाठी सर्वे करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com