करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (Education) मंडळाच्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या परीक्षांमधून आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे CBSE ने स्पष्ट केले आहे.
अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी; यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने यापूर्वीच बदल (Education) स्विकारण्यास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता तपासता येणारे प्रश्न अधिक विचारले जाणार आहेत. याप्रकारे प्रश्नपत्रिकेत बदल करण्यास सीबीएसईने (CBSE) सुरूवात केली आहे. हे बदल शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून होणार आहेत.
प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात होणार बदल (Education)
प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल केला जाणार असून या अंतर्गत अकरावी-बारावीच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, स्रोत आधारित एकत्रित प्रश्न आणि अन्य प्रश्नांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी वाढविणार आहेत तर लघु आणि दीर्घ उत्तरे लिहिणे अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येईल; असे CBSE ने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने सीबीएसईने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळांमध्ये क्षमतेवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासमध्ये नाविन्यता, क्रिटिकल आणि सिस्टिम थिंकिंग निर्माण व्हावी यासाठी त्यादृष्टीने बदल करण्यात येत आहेत; असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युअल, यांनी सांगितलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com