करिअरनामा ऑनलाईन । आकृतीची जिद्द कायम होती; तिला आयुष्यात (Success Story) काहीतरी करून दाखवायचं होतं आणि तिची ही जिद्द पूर्ण झाली; आज आकृती करोडो रुपयांची मालकीण झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून करिअर कारकिर्दीची सुरुवात केलेल्या आकृतीने आपली परमनंट नोकरी सोडून ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. असं म्हणतात की जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं तर तुमच्या मेहनत आणि जिद्दीसमोर संपूर्ण विश्वही झुकतं. असच काहीसं आकृती चोप्रासोबत (Aakruti Chopra) घडलं. जाणून घेवूया तिच्या करिअरच्या ग्राफविषयी…
आकृतीने नोकरी बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तिच्या पालकांकडून विरोध झाला पण आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे आणि ही आपल्यासाठी चांगली संधी आहे; असं तिने (Success Story) आपल्या आई-वडिलांना पटवून दिलं. पालकांनी सहमती दिल्यानंतर आकृती झोमॅटोमध्ये (Zomato) रुजू झाली आणि आता ती झोमॅटोमध्ये सर्वाधिक पगार घेणारी कर्मचारी ठरली आहे.
झपाट्याने झाली करिअर ग्रोथ
झोमॅटोसोबत काम करत असताना आकृतीने कायदेशीर, प्रशासन, जोखीम आणि अनुपालन यासह विविध टीमसोबत काम केले. तिला काही वर्षांपूर्वी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक (फायनान्स आणि ऑपरेशन्स) पदावर बढती मिळाली. अवघ्या एक दशकापूर्वी झोमॅटोमध्ये रुजू झालेल्या आकृतीने कंपनीत झपाट्याने यशाची पायरी चढली. 2012 मध्ये आकृतीने VP (फायनान्स आणि ऑपरेशन्स) पद सांभाळले तर २०२० मध्ये आकृतीने CFOची भूमिका पार पडली. त्यानंतर 2021 मध्ये तिची सह-संस्थापक आणि मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आकृती चोप्राविषयी जाणून घ्या…
झोमॅटोमध्ये सामील होण्यापूर्वी आकृती PWC मध्ये आर्टिकल असिस्टंट म्हणून काम करत होती. यानंतर ती २०११ मध्ये म्हणजे तब्बल १२ वर्षापूर्वी झोमॅटोमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून रुजू झाली. आकृतीला आता झोमॅटोसोबत काम करताना एक दशकाहून अधिक काळ उलटला आहे. याकाळात तिने कंपनीत अनेक भूमिका साकारल्या. २०२१ मध्ये आकृतीला पदोन्नती देण्यात आली आणि सह-संस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली तर याआधी ती फायनान्सच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होती.
१९८८ मध्ये झाला जन्म; घेते कोट्यावधी पगार (Success Story)
आकृतीचा जन्म १९८८ मध्ये झाला आहे. ती गुरुग्राम येथे स्थायिक आहे. तिने डीपीएस, आर. के. पुरम येथून शिक्षण घेतले आणि एल. एस. आर. मधून बी.कॉमची पदवी घेतली आहे. झोमॅटोमध्ये रुजू होण्यापूर्वी आकृतीने PSW मध्ये तीन वर्षे सेवा दिली तर २०२१ मध्ये झोमॅटोने आयपीओ (IPO) आणला तेवहा आकृतीच्या ESOP म्हणजेच कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन शेअरचे मूल्य १४९ कोटी रुपये होते जे त्यांनी विकले की नाही याबाबत स्पष्टता नाही परंतु आकृती सर्वाधिक शेअर मूल्य असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक होती. तसेच 2021 मध्ये आकृतीचे वार्षिक पॅकेज 1.63 कोटी रुपये होते. ब्लिंकिटचे सह-संस्थापक अलबिंदर धिंडसा आकृतीचे पती आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com