Career Success Story : परदेशात जाण्याची संधी आणि लाखोंच्या पगारावर सोडलं पाणी; हा तरुण पहिल्याच प्रयत्नात झाला DSP

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशात असे अनेक तरुण आहेत जे देशसेवा (Career Success Story) करण्यासाठी चांगली नोकरी सोडतात. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद असं या तरुणाचं नाव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे रहिवासी आहेत. त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलीस उपअधीक्षक होण्याचा मान मिळवला आहे.

परदेशात जाण्याची आणि लाखो रुपये पगाराची संधी सोडली
सय्यद अरीब अहमद (DSP Syed Areeb Ahmad) यांच्या करिअरची सुरवात झाली होती. त्यांना 1 लाख रुपये पगार आणि परदेशात जाण्याची संधी मिळाली होती. पण त्यांनी ही नोकरी नाकारुन सैन्यात भरती होण्याची तयारी सुरु केली होती. नागरी सेवा परीक्षांचा कसून अभ्यास करुन सय्यद अहमद हे पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) झाले आहेत. सय्यद अहमद यांचे आयआयटी कानपूरमधून (IIT kanpur) बी. टेक. झाले आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून त्यांनी एमएससी (MSC) केलं आहे. 2018 मध्ये ते पीपीएस (PPS) अधिकारी झाले होते.

परदेशात जावून नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती
सय्यद अहमद यांचे वडील व्यवसायानं वकिल होते. मुलाने आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन चांगली नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा (Career Success Story) होती. पण सय्यद अहमद यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. त्यांना भारतात राहून लोकांना सहकार्य करायचे होते. या आवडीपोटी त्यांनी महिन्याला 1 लाख रुपये पगार देणाऱ्या नोकरीवर पाणी सोडले. समजसेवेचा वसा पूर्ण करण्यसाठी त्यांनी पोलीस अधिकारी होणं पसंत केलं.

अभ्यासासाठी सय्यद अहमद यांनी दिल्ली गाठली
सुरुवातीच्या काळात सय्यद अहमद प्रयागराजमध्ये राहून सरकारी परीक्षेची तयारी करत होते. त्यानंतर काही काळानंतर ते दिल्लीला गेले. त्यांनी कसून अभ्यास केला आणि 2018-19 मध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते DSP झाले. यापूर्वी ते PPS ची परीक्षा पास झाले होते.

कर्तव्यदक्ष अधिकारी
नोकरीत कर्तव्य बजावत असताना सय्यद अहमद हे पारदर्शक काम करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी धाडसाने अनेक गुन्हे उघड केले आहेत. दरोडे असतील किंवा गांजा (Career Success Story) तस्करी असेल या घटनांचा त्यांनी छडा लावला आहे. अनेक गुन्हेगारांना त्यांनी शिताफीने अटक केली आहे. सय्यद अहमद यांच्याकडे ताज महलची (Taj Mahal) सुरक्षा आणि आग्रा शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन ते स्वतःवर दिलेली जबाबदारी पार पाडत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com