Big News : नोकरी नसलेल्या तरुणांना सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये??

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । “पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत (Big News) केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला 10 वी पास तरुणांना प्रत्येकी 6 हजार रुपये देणार”; हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल. पण असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून तुमची फसवणूक होणार हे निश्चित. या व्हायरल होणाऱ्या मेसेजपासून तुम्ही चार हात लांबच रहा. काय आहे फॅक्टचेक पाहूया….

मेसेज मधून कोणतं आवाहन करण्यात येतंय
व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार बेरोजगार तरुणांना सरकार प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत सरकार (Government) तरुणांना भत्ता देणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलवर खालील लिंकवर तात्काळ क्लिक करून अर्ज करा; असं आवाहन या मेसेजमध्ये करण्यात आलं आहे. मात्र हा संदेश बनावट आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.

देशातील अनेक तरुण सध्या बेरोजगारीने त्रस्त आहेत. सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी.. तरुण-तरुणी वेगवेगळ्या पर्यायांमधून नोकरीचा शोध घेत आहेत. अशा तरुणांची (Big News) कमजोरी लक्षात घेवून काही स्कॅमर यांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून अतिशय वेगाने नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांपर्यंत पोहचले जाते. व्हायरल मेसेजच्या माध्यमातून अशा तरुणांना जाळ्यात ओढलं जातं.

संशयास्पद लिंक क्लिक करू नका (Big News)
तुम्ही कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका. अशा मेसेज मार्फत तुमच्या खात्यातील माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात येतो; ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो. स्वतःचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन पीआयबी फॅक्टचेकने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com