SPPU Pune : पुणे विद्यापीठाच्या पदवी सोहळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु; इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने केले आहे.

कुठे करायचा अर्ज
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी दि. 30 मार्चपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना दि. 31 मार्च ते दि. 15 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

कोणते विद्यार्थी करु शकतात अर्ज (SPPU Pune)
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाचा नमुना, शुल्क याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज (SPPU Pune) योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com