करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या कालावधीत होणार परीक्षा
प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT CET ही सामाईक प्रवेश परीक्षा दि. १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
इतक्या विद्यार्थ्यांनी केली आहे नोंदणी (MHT CET Exam 2024)
या परीक्षेसाठी आतापर्यंत 7 लाख 12 हजार 426 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सीईटी सेलने अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण (MHT CET Exam 2024)
या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची तपासणी केली असता अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे ‘सीईटी सेल’च्या निदर्शनास आले. त्यामुळे सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी यापूर्वी प्रवेश परीक्षा कक्षाने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नयेत, म्हणून विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
महत्वाचे…
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज कसा भरायचा, यासंदर्भात संपूर्ण माहिती प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
काही महत्वाच्या तारखा –
विलंब शुल्क भरून ऑनलाइन (MHT CET Exam 2024) अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे – दि. 15 मार्च
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत – दि. 16 मार्च
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com