करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेतली (CTET Exam 2024) जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांना दि. 2 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
CBSEने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. उमेदवारांना २ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे; असे CBSEने स्पष्ट केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय (CTET Exam 2024) शिक्षक शिक्षण परिषदेच्या (NCRE) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
केंद्रीय स्तरावर CBSE कडून CTET परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार येत्या 7 जुलैला होणारी CTET ही 19 वी परीक्षा आहे. देशभरातील 136 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी 20 भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.
अशी आहे पेपरची वेळ (CTET Exam 2024)
पेपर क्रमांक 1 सकाळी 09:30 ते 12;00 तर पेपर क्रमांक 2 दुपारी 04:30 या वेळेत होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची नावे, महत्त्वाच्या तारखा असा संपूर्ण तपशील CTET च्या https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवरुन उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com