करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न- अशोकाची आज्ञापत्रे कोणत्या भाषेत लिहिली आहेत?
1. संस्कृत
2. पारसी (GK Updates )
3. ब्राह्मी
4. ओडिसी
उत्तर- अशोकाचे शिलालेख प्राकृत भाषेत लिहिलेले असून त्यांची लिपी ब्राह्मी व खरोस्ती आहे. मध्ययुगीन भाषांना एकत्रितपणे प्राकृत भाषा म्हणतात, त्यापैकी मगधी भाषा ही बहुतेक शिलालेखांची मुख्य भाषा आहे, ज्यामध्ये ब्राह्मी लिपी वापरली गेली आहे.
प्रश्न- पंडित जसराज कोणत्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत?
1. शास्त्रीय संगीत
2. लोकगीत (GK Updates )
3. लोकनृत्य
4. कविता
उत्तर 1- पंडित जसराज हे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. ते मेवाती घराण्याचे (संगीत वंश) होते. आपल्या 75 वर्षांच्या शास्त्रीय संगीत कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.
प्रश्न – खालीलपैकी कोणती भारताची अभिजात भाषा नाही?
1. संस्कृत
2. पाली
3. तमिळ
4. मल्याळम
उत्तर- 2. पाली ही भारताची अभिजात भाषा नसून प्राचीन भाषा आहे. सध्या संस्कृत, तेलगू, तमिळ, उडिया, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे.
प्रश्न- (GK Updates ) 2020 चा ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून खालीलपैकी कोणता शब्द निवडला गेला आहे?
1. आधार
2. संविधान
3. आत्मनिर्भरता
4. महामारी
उत्तर- 3. आत्मनिर्भरता, हा हिंदी शब्द 2020 चा ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून निवडला गेला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com