MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करुन या भरती प्रक्रियेत सहभागी होणं हिताचं ठरणार आहे.

MPSC च्या भरतीकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागून राहिलेले असते; अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. आयोगाने काढलेल्या या अधिसूचनेत सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ पदांच्या (MPSC Recruitment 2024) एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढे वाचा…

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 45 वर्षे

अर्ज फी – (MPSC Recruitment 2024)
1. अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
भरतीचा तपशील –

पदाचे नावपद संख्या 
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ39 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अरु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती (MPSC Recruitment 2024) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. उमर्दवरांनी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com