GK Updates : अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय चलनावर कोणाचे चित्र छापले जायचे? सामान्य ज्ञान वाढवणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – भारतीय नाणी आणि नोटांवर अशोक स्तंभ पहिल्यांदा कधी छापण्यात आला?
उत्तर – अशोक स्तंभ प्रथमच 1949 मध्ये भारतीय नाणी आणि नोटांवर छापण्यात आला.
प्रश्न 2 – अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय (GK Updates) चलनावर कोणाचे चित्र छापले होते?
उत्तर – अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय नाण्यांवर किंग जॉर्जचे चित्र छापले जायचे.

प्रश्न 3 – जगातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे? (GK Updates)
उत्तर – जगातील सर्वात लांब ट्रेनचे शीर्षक ‘The Australian BHP Iron Ore’ च्या नावावर आहे. या ट्रेनमध्ये 682 डबे आहेत. ही ट्रेन खेचण्यासाठी 8 इंजिनांची आवश्यकता होती आणि या ट्रेनची एकूण लांबी 7.3 किलोमीटर आहे.
प्रश्न 4 – भारताच्या ईशान्य भागात असलेल्या नागालँड राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे?
उत्तर – नागालँड राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे.
प्रश्न 5 – (GK Updates) राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?
उत्तर – राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्षे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com