करिअरनामा ऑनलाईन । ‘प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे.
या नव्या शैक्षणिक धोरणामुळे येत्या काळात बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे. या विद्यार्थ्यांना परिक्षेत गुणांची चांगली कमाई करण्यासाठी एक नव्हे तर (New Education Policy) दोन संधी मिळणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की, शैक्षणिक सत्र 2025-26 पासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनवेळा 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसण्याचा पर्याय मिळेल.
आता वर्षातून दोनवेळा देता येणार बोर्डाची परीक्षा (New Education Policy)
NEP 2020 अंतर्गत केंद्राच्या योजनेबद्दल बोलताना मंत्री प्रधान म्हणाले; “शैक्षणिक सत्र 2025-26 पासून, विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेस दोनवेळा बसण्याची संधी मिळणार आहे.” गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार (NCF) विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्यांना सर्वोत्तम गुण कायम ठेवण्याचा पर्यायही मिळेल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण कायम ठेवता येतील.
10 बॅगलेस दिवस
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दरवर्षी शाळांमध्ये 10 बॅगलेस दिवस (New Education Policy) सुरू करण्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि खेळ अशा उपक्रमांवर विशेष भर देण्याचा सल्ला दिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com