करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की सिनेतारकांची मुले (UPSC Success Story) चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावतात. बहुसंख्य सिनेतारकांची मुले कोणत्या ना कोणत्या मार्गाने फिल्मी दुनियेशी जोडलेली असतात. खूप कमी स्टार किड्स या चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःची ओळख निर्माण करतात. आपण आज अशाच एका तरुणाविषयी जाणून घेणार आहोत. हा तरुण IAS अधिकारी बनला आहे. श्रुतंजय नारायणन असं त्याचं नांव. याचे वडील वडील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र फिल्मी दुनियेत स्थान निर्माण करण्याऐवजी त्याने स्वत:ची वेगळी वाट निर्माण केली आहे. सध्या तो तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पाहूया त्याच्या प्रवासाविषयी…
वडिलांना मिळाली मुलामुळे ओळख
प्रसिद्ध तमिळ अभिनेते चिन्नी जयंती यांचा मुलगा श्रुतंजय नारायणन IAS अधिकारी झाला आहे. आतापर्यंत मुलगा त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखला जात होता, आता वडिलांना मुलाच्या नावाने नवीन ओळख मिळाली आहे.
शाळा-कॉलेजमध्ये होती रंगभूमीची आवड (UPSC Success Story)
श्रुतंजय नारायणन (Shrutanjay Narayanan) शाळा-कॉलेजमधील मित्रांसोबत नाटक आणि इतर स्टेज शोमध्ये सहभागी होत असत. तो वडिलांनी भूमिका साकारलेले प्रत्येक नाटक पहायचा. त्याने आपल्या मित्रांनाही अभिनयातील बारकावे शिकवले पण श्रुतंजयला स्वतःला या क्षेत्रात करिअर करण्यामध्ये फार रस नव्हता. त्याच्यासाठी रंगभूमी म्हणजे रंगमंचावर स्वतःला व्यक्त करणे आणि नवीन मित्र बनवणे एवढ्यापुरती मर्यादित होती; कारण त्याला UPSC देवून IAS अधिकारी व्हायचं होतं.
दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
श्रुतंजय नारायणन हे 2015 च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. यूपीएससी (UPSC) परीक्षेचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. यामध्ये त्याने संपूर्ण भारतात 75 वी रॅंक मिळवली आहे. श्रुतंजय सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्याला त्याचे शिक्षक, कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे सहकार्य मिळाल्याचे तो सांगतो.
नोकरी करत केला अभ्यास
श्रुतंजय नारायणन एका स्टार्टअप कंपनीमध्ये नोकरी करत (UPSC Success Story) होता. तो नाईट शिफ्टमध्ये काम करायचा. नोकरी करत असताना त्याने अभ्यासासाठी वेळ काढून दररोज 4 ते 5 तास सेल्फ स्टडी केला. परीक्षेच्या काही आठवडे आधी, त्याने आपला अभ्यासाचा दिनक्रम बदलला. तो दररोज 10 ते 12 तास अभ्यास करु लागला. यासोबतच तो तब्येतीकडे लक्ष देत असे. उत्तम आहार आणि झोपेसोबतच योगा; असा त्याचा दिनक्रम होता.
विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला
UPSC मध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराची मुलाखत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. श्रुतंजय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण उमेदवारांना सांगतो की, या मुलाखतीत उमेदवाराला पॅनेल समोर उत्तर देताना 20 मिनिटांत आपला प्रभाव पाडावा लागतो. ही 20 मिनिटे महत्वाची ठरतात. श्रुतंजय याने या परिक्षेत समाजशास्त्र हा पर्यायी विषय ठेवला होता, तर त्याला भूगोलातही प्रचंड आवड आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com