Big News : महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Big News) बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी होत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वयात वाढ झाली?
राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षकांचे (Teachers) सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच राज्य सरकारने शासनातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केलेले नाही. मात्र कृषी विद्यापीठ अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक (Big News) दिवसांपासून कृषी शिक्षक सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत होते. आता राज्य सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे.

अ, ब, क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षेच (Big News)
महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. परंतु यामध्ये राज्यातील
अ, ब आणि क संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्ष इतकेच आहे. हे कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central Government Employee) निवृत्तीचे वय जास्त असताना राज्यशास्त्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय देखील वाढवण्यात यावे; अशी मागणी होत आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार कोणत्या निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com