Success Story : सर्वांशी भांडून आईने मुलीला शिकवलं; अनेक आव्हानं पेलत किर्ती झाली डेप्युटी जेलर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेश लोकसेवा (Success Story) आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या PCS-2023 परीक्षेच्या निकालात शाहबादच्या किर्ती सागरनेही यश मिळविले आहे. किर्ती हीची डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली आहे. तिला या परिक्षेत 67 वे स्थान मिळाले आहे. किर्तीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई गीता राणी यांना दिले आहे. कीर्तीच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

पतीच्या निधनानंतर मुलींची जबाबदारी आईच्या खांद्यावर (Success Story)
शाहबादच्या मोतीपुरा गावात राहणाऱ्या गीता राणी या शिक्षिका आहेत. त्यांचे पती सुभाष सिंह यांचे २००५ मध्ये निधन झाले. त्यानंतर कीर्ती आणि संजना या दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वडिलांच्या निधनाच्या वेळी कीर्ती चौथ्या इयत्तेत शिकत होती. आईने आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. 2008 मध्ये त्यांची शिक्षामित्र पदासाठी निवड झाली. नंतर 2015 मध्ये गीता राणी सहाय्यक शिक्षिका झाल्या. त्यांनी आपल्या मुलींना नेहमी अभ्यासासाठीप्रोत्साहन दिले.

वडिलांच्या निधनानंतर आईने आत्मविश्वास तुटू दिला नाही
कीर्तीच्या वडिलांचे 2005 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. वडील सुभाष सिंह यांच्या निधनानंतर आई गीता राणी यांनी कीर्तीची हिंमत खचू दिली नाही आणि आपल्या दोन्ही मुलींची (Success Story) जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. गीता राणी यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. वडील अचानक सोडून गेले असले तरी त्यांनी आपल्या मुलींचा आत्मविश्वास तुटू दिला नाही.

उच्च शिक्षित कीर्ती अशी झाली डेप्युटी जेलर
कीर्ती सागर सांगते की, “मला खूप बरे वाटत आहे. माझी डेप्युटी जेलर (Deputy Jailor) पदासाठी निवड झाली आहे; यावर विश्वास बसत नाही.” कीर्ती सागरने शाहबाद शहरातील कमला इडन गार्डनमधून इयत्ता दहावी पास केली. त्यानंतर खरसोलच्या एस. के. कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. एवढयावच ती थांबली नाही. तिने आयएफटीएममधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक (B.Tech) केले. यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला. कीर्तीने दोनदा पीसीएसची (PCS) परीक्षा दिली होती. तिसऱ्या प्रयत्नात तिची डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली आणि तिचे ध्येय पूर्ण झाले.

“सर्वांशी भांडून आईने मला शिकवले”
कीर्तीने दहावीची परीक्षा पास केली. तिला पुढे शिकायचे होते. पण कुटुंबातील सदस्यांना हे मान्य नव्हते. कीर्तीचे संपूर्ण कुटुंब तिच्या शिक्षणाच्या विरोधात असताना तिच्या आईने (Success Story) सर्वांच्या विरोधात जाऊन सर्व आर्थिक अडचणींचा सामना करत आपल्या मुलीला शिक्षण दिले. कीर्ती तिच्या या यशाचे सर्व श्रेय तिच्या आईला देते. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने अनेक आव्हानांचा सामना केला. तिने मिळवलेल्या यशाने तीचे सहकारी आणि गावातील लोक खूप आनंदी आहेत. मित्र, शेजारी आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com