करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण (Abroad Scholarship for Indian Students) घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या 79 देशांमध्ये शिक्षणासाठी गेले होते. भारतीय विद्यार्थी ज्या देशांमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती देतात त्या यादीत युनायटेड किंगडम, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, यूएई आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. जेव्हा विद्यार्थी परदेशात शिकण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या समोर पैशाचा मोठा प्रश्न उभा राहतो. आजकाल अनेक देशांच्या सरकार कडून परदेशी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिकण्यासाठी कोणत्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिप मिळू शकतात याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. इनलाक्स शिवदासानी फाउंडेशन स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती सामाजिक विज्ञान, मानविकी, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर या विषयांचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
2. AAUW इंटरनेशनल स्कॉलरशिप (महिलांसाठी)
ही शिष्यवृत्ती अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन द्वारे प्रदान केली जाते. यासाठी अमेरिकेत पूर्णवेळ पदवी किंवा पोस्ट डॉक्टरेट पदवी पूर्ण केलेल्या महिला अर्ज करू शकतात.
3. फुल ब्राइट फॉरेन स्टुडंट प्रोग्राम
हा सरकारी अनुदानित उपक्रम आहे. ही शिष्यवृत्ती (Abroad Scholarship for Indian Students) आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि कलाकारांना युनायटेड स्टेट्समध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ अभ्यास करण्यासाठी दिली जाते.
4. ह्यूबर्ट हम्फ्री फेलोशिप
ह्युबर्ट हम्फ्रे फेलोशिप ही आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी दिली जाते. ही नॉन-डिग्री शिष्यवृत्ती यूएस मध्ये 10 महिन्यांच्या शैक्षणिक अभ्यासाला समर्थन देते. या अंतर्गत अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यास करता येतो.
5. टाटा स्कॉलरशिप फॉर कॉर्नेल यूनिवर्सिटी
ही शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत कॉर्नेल विद्यापीठात शिकणाऱ्या २० भारतीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क आणि वार्षिक अभ्यासक्रम शुल्क समाविष्ट आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com