करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेच्या निकालासंदर्भात (UGC NET Result) महत्वाची बातमी आहे. UGC NET परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 292 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एनटीएने निकालाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार UGC NET परीक्षेचा निकाल 17 जानेवारी 2024 रोजी NTA च्या अधिकृत वेबसाइटवर घोषित केला जाणार आहे.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील नैसर्गिक आपत्ती; जसं की मिचॉन्ग चक्री वादळामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे नियोजित तारखेला निकाल जाहीर होणार नसून आता दि. 17 जानेवारी 2024 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
असा पहा निकाल – (UGC NET Result)
1. UGC NET निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
2. निकाल जाहीर होताच वेबसाइटच्या होम पेजवर निकालाची लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.
3. पुढे तुम्ही नवीन पेजवर अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन यासारखी लॉगिन माहिती भरून सबमिट करायची आहे.
4. ही माहिती सबमिट करताच निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊ शकता. (UGC NET Result)
राष्ट्रीय पात्रता परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय उमेदवार हेल्प डेस्क क्रमांक 011-40759000/011- 69227700 वर संपर्क साधू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com