करिअरनामा ऑनलाईन । गिरीश मातृभूतम हे सॉफ्टवेअर (Career Success Story) कंपनी ‘फ्रेशवर्क्स इंक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात चेन्नईतून केली. पण आता ही कंपनी अमेरिकास्थीत कंपनी आहे. 2021 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधील ब्लॉकबस्टर IPO द्वारे त्यांनी सुमारे एक दशलक्ष डॉलर्स कमवले. एवढंच नाही तर त्यांनी आपल्यासोबत 500 कर्मचाऱ्यांना रातोरात करोडपती बनवले. गिरीश मातृभूतम यांच्या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत….
शून्यातून विश्वनिर्मिती
गिरीश मातृभूतम यांची कारकिर्द म्हणजे शून्यातून शिखरावर पोहोचण्याची कथा आहे. अगदी लहान वयात त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात दिग्गज बनण्याचा प्रवास केला आहे. त्यांची कंपनी ‘फ्रेशवर्क्स इंक’ ही सध्या 95,000 कोटी रुपयांची कंपनी आहे.
नातेवाईकांकडून पैसे घेवून शिक्षण पूर्ण केले (Career Success Story)
गिरीश मातृभूतम यांचा जन्म तमिळनाडूतील त्रिची शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर ते चेन्नईला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. अभ्यासात त्यांची प्रगती तशी सामान्य होती. त्यानंतर 1992 मध्ये त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले. त्यांचे वडील एक सामान्य सरकारी कर्मचारी होते. ते गिरीश यांची MBAची फी भरण्यास असमर्थ होते. मुलाचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून कर्ज घेतले आणि मुलाच्या शिक्षणाची फी भरली.
एका जाहिरातीने लक्ष वेधले
MBA पूर्ण केल्यानंतर गिरीश यांना नोकरी लागली. झोहो येथे नऊ वर्षे ते चांगल्या पगारावर आरामदायी नोकरी करत होते. नंतर एका वेबसाइटवरील जाहिरातीने (Career Success Story) त्यांना नवीन IT हेल्पडेस्क उत्पादन तयार करण्यासाठी प्रेरित केले. 2010 मध्ये, त्यांनी त्यांचा मित्र आणि सहकारी शान कृष्णसामी सोबत चेन्नईमध्ये ‘फ्रेशवर्क्स’ कंपनी सुरु केली. या कामासाठी त्यांनी 700 फुटांचे छोटे गोदाम घेतले होते.
कंपनीत होते 95,000 कोटींची उलाढाल
गिरीश मातृभूतम यांच्या कंपनीचा महसूल 8 वर्षांत शून्य ते 100 दशलक्ष डॉलर्सवर गेला. येथून पुढील दीड वर्षात ती 200 दशलक्ष डॉलर्सची कंपनी बनली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि जर्मनी येथेही त्याची कार्यालये आहेत. फ्रेशवर्क्सची आज 50,000 पेक्षा जास्त ग्राहकांसह 95,000 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये Honda, Boss, Citizen Advice, Toshiba आणि Cisco या ब्रँडचा समावेश आहे.
व्यवसायात करत असताना त्यांनी अनेकवेळा चढउतारही पाहिले आहेत. गिरीश यांच्या आयुष्यात संघर्ष आणि आव्हाने कमी वयात आली. जेव्हा ते सात वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांचा वियोग पाहिला. या घटनेमुळे ते अकाली प्रौढ आणि स्वावलंबी झाले आहेत; असा त्यांचा विश्वास आहे.
सुपरस्टार रजनीकांत आहे आवडता
गिरीश मातृभूतम हे तमिळ सुपरस्टार रजनीकांत (Career Success Story) यांचे मोठे फॅन आहेत. रजनीकांत यांच्याबद्दलची त्यांची उत्कटता एका गोष्टीवरून समजू शकते ती म्हणजे जेव्हाही रजनीकांत यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा ते चेन्नईतील संपूर्ण सिनेमा हॉल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बुक करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com