NHM Recruitment 2023 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; मिळवा भरघोस पगाराची नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई ४०००१२
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 ते 70 वर्षे

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2023)

पद पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 09
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी 02
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ 05
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक 01
सांख्यिकी सहाय्यक 03
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 13
औषधनिर्माता 05
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
पी.पी.ए म. समन्वयक 03
समुपदेशक 01
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 06
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी MBBS
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ
  • MD Microbiology/Ph. D Medical Microbiology
  • M.Sc. Medical Microbiology
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक Graduate
सांख्यिकी सहाय्यक Graduate
टी. बी. हेल्थ व्हीजीटर Graduate in science
औषधनिर्माता Degree/ Diploma in Pharmacy form recognized University
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Intermediate (10+2) and Diploma or certified course in Medical Laboratory
Technology or equivalent
पी.पी.ए म. समन्वयक Post Graduate
समुपदेशक Bachelor’s Degree in Social Work/ Sociology/Psychology
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक Bachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course.
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ M.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT.
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक Graduate or Diploma in Medical Laboratory technology or equivalent form Govt recognized institution.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
वैद्यकीय अधिकारी 60,000
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी 60,000
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ 75,000
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक 20,000
सांख्यिकी सहाय्यक 17,000
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 15,000 + 1500
औषधनिर्माता (NHM Recruitment 2023) 17,000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17,000
पी.पी.ए म. समन्वयक 20,000
समुपदेशक 17,000
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 20,000
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 25,000
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक 20,000

 

आवश्यक कागदपत्रे –
1. पुर्ण माहिती भरलेल्या गुगल फॉर्मची प्रिंट
2. वयाचा पुरावा
3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका (NHM Recruitment 2023)
5. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
6. शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7. जात वैधता प्रमाणपत्र इ छायांकित प्रतींसह
8. महाराष्ट्र राज्याचा अधिवास
9. प्रमाणपत्र (Domicile Certificate)
10. आधारकार्ड
11. पॅनकार्ड
12. सध्याचा फोटो
13. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
14. वाहन चालविण्याचा परवाना
15. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
16. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com