करिअरनामा ऑनलाईन । ती उच्चशिक्षण घेवून डॉक्टर (MPSC Success Story) झाली तरी तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) करण्याचा निर्णय घेतला. बीड हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील प्रियांका मिसाळने प्रामाणिक मेहनत घेवून तिचं कर्तुत्व सिध्द केलं आहे. तिने या परिक्षेत सलग दोनवेळा यश मिळवलं आहे. जाणून घेवूया तिच्या जिद्दीविषयी….
डॉक्टर झाल्यानंतरही द्यायची होती MPSC
प्रियांका ही मूळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची रहिवासी आहे. तिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. तर वडील मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळतात. तिने शालेय शिक्षण हे बीडमध्ये पूर्ण केले तर बारावी औरंगाबादमध्ये पूर्ण केली. प्रियांकाने २०१५ साली नागपूरच्या डेन्टल कॉलेजमधून बीडीएसची (BDS) पदवी घेतली. यानंतर तिने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळवला.
असा केला अभ्यास (MPSC Success Story)
उच्चशिक्षण घेऊन देखील तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तयारी दरम्यान तिने अभ्यासक्रम समजून घेणे, गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त सराव करणे याकडे विशेष लक्ष दिले. तरीही तिला पहिल्या प्रयत्नात काही कारणास्तव अपयश आले. पण ती अपयशामुळे खचली नाही. उलट तिने अपयशाची कारणे शोधली आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.अभ्यास करताना मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून ती दूर राहिली.
सलग दोनवेळा मारली बाजी
संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत करुन तिने अभ्यास केला. तिने प्रयत्नांना सातत्य, संयमाची जोड दिली. MPSC परीक्षा दिल्यानंतर सुरुवातीला तिची 2019 मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी (MPSC Success Story) पदी निवड झाली. पण तरीही तिने मोठे पद मिळवण्यासाठी अभ्यास चालूच ठेवला. प्रियांकाने पुन्हा परीक्षा दिली आणि तिची राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार पदावर निवड झाली. स्पर्धा परीक्षेत तिला दोनवेळा यश मिळणं ही बाब तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी अभिमानाची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com