Success Story : तिचे खाण्या-पिण्याचे होते वांदे; मेहनतीने सेल्फ स्टडी केला अन् अधिकारी झाली; आईलाही दिलं उत्तम शिक्षण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्या मनात काहीही (Success Story) करण्याची जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळवणं अवघड नाही. इज्या तिवारी यांनी हे म्हणणं त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जात त्यांनी मेहनतीच्या बळावर आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. इज्या यांची जिल्ह्यात पहिली  महिला एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आपण त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

घर गेले आणि बचतीचे पैसेही संपले
लखनौ येथील रहिवासी असलेल्या इज्या तिवारी यांची जिल्ह्यात प्रथमच परिवहन विभागाची महिला अधिकारी म्हणजेच एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी ८वीत शिकत होत्या. वडिलांच्या आजारपणात घरातील सर्व बचत खर्च झाली. एक वेळ अशी आली की आपलीच माणसे आपल्याला सोडून गेली आणि वडिलोपार्जित घरही राहिले नाही. त्यांच्या कुटुंबाला भाड्याच्या घरात रहावे लागले. वडील गेल्यानंतर आईची मनस्थिती पूर्ण बिघडली होती. घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. ही परिस्थिती मुलगी स्वतः आईचा आधार बनली. इज्या तिवारी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

नोकरी करत असताना केला अभ्यास (Success Story)
इज्या सांगते; “आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सर्व काही बदलले आणि मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आमच्या जवळचे बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण मी हार मानली नाही. ब्राइट लाइन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्याकडे पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिले. मला लिहायला आणि वाचायला आवडायचे. वयाच्या 12 व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. खूप कष्ट करून बँकेत नोकरी लागली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. दिवसभर काम करुन बँकेतून घरी आल्यानंतर मी रात्री तासनतास अभ्यास करायचे. मी 4 वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सेल्फ स्टडीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मिळाले यश
कॉलेज करत असताना इज्या शिकवण्या घेत असे. तिने तिच्या आईलाही पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. ती संगते; “माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर आई उद्ध्वस्त झाली होती. मी अनेक संकटांना तोंड देत आईची काळजी घेतली. मुली ऐवजी आई बनूनच आईची सेवा केली. 2014 मध्ये बँकेत नोकरी मिळाली. पण माझं एवढयावर समाधान होत नव्हतं. मला सरकारी सेवेत सामील (Success Story) व्हायचं होतं. यासाठी मी UPPCS परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. माझा सेल्फ स्टडीवर भर होता. तसेच ऑनलाईनन आणि इतर सोर्सचा  आधार घेवून अभ्यास सुरु ठेवला. याचा परिणाम म्हणून 2018 च्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगते
इज्या तिवारी सांगतात की उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची किंवा कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी (Success Story) घ्यावी लागते. उमेदवारांनी अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन करावे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनी अभ्यास चालूच ठेवला. घरची जबाबदारी पार पाडत नोकरी करत असताना त्यांनी दिवसातील 5 ते 6 तास मन लावून अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश न होता पूर्ण समर्पण आणि मनापासून तयारी करा; यश नक्कीच मिळेल; असा सल्ला त्या देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com