करिअरनामा ऑनलाईन । गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे (Police Patil Bharti 2023) रखडलेल्या जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांतील 476 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.
विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती
कोपर्डी (ता. कर्जत) येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सकल मराठा समाजाने राज्यभर भव्य मोर्चे काढले होते. कोपर्डी अत्याचार खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. या मोर्चाची दखल घेत राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस पाटील पदाची भरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. कोरोना संसर्ग आजाराची साथ २०१९ मध्ये आली. सर्वत्र लॉकडॉऊन करावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी कोरोनाची साथ आली. या दोन्ही साथी नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरील भरती, बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अशा विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती.
पोलीस आणि महसूल प्रशासनाचा समन्वय साधणारा पोलीस पाटील (Police Patil Bharti 2023)
पोलीस पाटील हे पद गावात प्रतिष्ठेचे पद म्हणून ओळखले जाते. पोलीस आणि महसूल प्रशासनासाठी महत्त्वाचा समन्वय असतो. गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची जबाबदारी असते. गावात साथीचे आजार आल्यास त्याची माहिती महसूल प्रशासनाला देणे आदी कर्तव्य त्यांचे असतात.
कधी आणि कोठे निघणार सोडत
संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यांतील १५१ गावांतील पदांकरिता संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, नवीन नगर रोड, संगमनेर या ठिकाणी सभेचे सकाळी ११ वाजता आयोजन केलेले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी (Police Patil Bharti 2023) शैलेश हिंगे यांनी दिली. नगर व नेवासे तालुक्यांतील १२९ गावांतील पदांकरिता नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर या ठिकाणी दुपारी ३ वाजता सभेचे आयोजन केलेले आहे, तर पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १९६ गावांतील पदांकरिता सकाळी ११ वाजता पाथर्डी तहसील कार्यालयात काढली जाणार असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com