करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्य पात्रता (SET Exam 2023) परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. 2024 मध्ये दि. 7 एप्रिलला एम-सेट ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपात होणारी ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत 38 सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते. 39 व्या सेट परीक्षेचे आयोजन यापूर्वीप्रमाणेच पारंपारिक पद्धतीने दि. 7 एप्रिल 2024 ला केले जाणार आहे. मात्र 2025 पासून घेण्यात येणारी सेट परीक्षा ही केंद्रनिहाय ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाईल.
एप्रिलमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेची परीक्षार्थ्यांना प्रतीक्षा आहे. एकूण 300 गुणांसाठीच्या या परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले (SET Exam 2023) जातील. पेपर क्रमांक 1 मध्ये प्रत्येकी दोन गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. शिक्षक अध्यापन व संशोधन कौशल्ये या विषयावरील पेपर क्रमांक एक असेल. पेपर क्रमांक दोन हा परीक्षार्थ्यांचा विशेष विषयावर राहणार असून, एकूण 71 विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या यूजीसी-नेट परीक्षेचे आयोजन संगणकावर आधारित केले जाते. या धर्तीवर 2025 पासून सेट परिक्षाही संगणकावर आधारित घेतली जाईल. दरम्यान UGC NET प्रमाणे एम-सेट परीक्षाही वर्षातून दोन सत्रांमध्ये घेतली जाते की एकदा घेतली जाते, तसेच शिक्षणक्रम, विषयांच्या संख्येत काय बदल केले जातात, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com