करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न1. कोणते झाड कधीही घरात लावू नये? (GK Updates)
उत्तर – पिंपळाचे झाड घराच्या आत लावू नये.
प्रश्न 2. भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – कर्नाटक
प्रश्न 3. तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्याने काय फायदा होतो?
उत्तर – तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो.
प्रश्न 4. भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतात कोणत्या ठिकाणी उपदेश दिला होता?
उत्तर- सारनाथ
प्रश्न 5. (GK Updates) भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही?
उत्तर – तामिळनाडू राज्यात गव्हाची लागवड होत नाही.
प्रश्न 6. मुघल बादशाह अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
उत्तर- राजा तोरडमल
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com