करिअरनामा ऑनलाईन । त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती (Career Success Story) बेताची असल्याने वडील मोलमजुरी करुन सांसाराचा गाडा ओढत होते. गरिबीत त्यांना भाड्याचे घर 9 वेळा बदलावे लागले. पण नशीब पलटलं. आज 42 लाखांहून अधिक युजर्स या कुटुंबाला फॉलो करतात. सौरव जोशीने व्लॉगिंगच्या दुनियेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौरवच्या चॅनलचे यूट्यूबवर 21 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. त्याची कमाई लाखोंच्या घरात आहे.
वडील करायचे मजूरी
सौरव जोशी मूळचा उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या करिअरची कहाणी खूपच रोमांचक आहे. सौरवचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी कौसानी येथे झाला. सौरवच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील कामाच्या शोधात दिल्लीला आले होते. आपल्या कुटुंबाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सौरवचे वडील पीओपीची कामे करू लागले. मुलांना त्रास होवू नये; यासाठी त्यांनी स्वतः हालअपेष्टा सोसल्या.
प्रयत्न करूनही आर्किटेक्चर होवू शकला नाही (Career Success Story)
सौरव आणि त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीचा सामना करत पुढे जात होते. त्याची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द होती. सौरवला इंटरमिजिएटमध्ये चांगले गुण मिळाले नाहीत, त्यामुळे त्याला करिअरची चिंता सतावू लागली. लोकांच्या सल्ल्यानुसार तो डिझायनिंग आणि आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीला गेला. कोचिंग घेताना तो व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, पर्स्पेक्टिव ड्रॉइंग इत्यादी गोष्टी चांगल्या प्रकारे शिकला. या काळात त्याची चित्रकलेची आवड लक्षणीयरीत्या वाढली. मात्र, कोचिंग करूनही त्याची आर्किटेक्चरमध्ये निवड झाली नाही, तेव्हा तो घरी परतला आणि वडिलांसोबत पीओपीचे काम करू लागला.
YouTube ने दिली ओळख
या काळातही सौरवने चित्र काढण्याचे काम सुरू ठेवले. भावाच्या सांगण्यावरून त्याने यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला यश मिळाले नाही; पण अखेरीस सौरवने YouTubeवर व्लॉग चॅनेल तयार केले. लॉकडाऊन दरम्यान एके दिवशी त्याने संपूर्ण कुटुंबासह चित्र (Career Success Story) काढतानाचा व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओने सौरवचे नशीब बदलले. आज तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज 42 लाखांहून अधिक युजर्स सौरवला फॉलो करतात. व्लॉगिंगच्या दुनियेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करुन त्याने आपल्या चॅनेलवर 21 मिलियन सब्सक्राइबर्स मिळवले आहेत. रिपोर्टनुसार सौरव महिन्याकाठी 75 ते 80 लाख रुपये कमावतो. त्याच्या काष्टाचं चीज झालं आहे. सौरवने इतक्या कमी वयात जे यश मिळवलं आहे; ते पाहून त्याच्या वयाच्या तरुण मुलांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com