SWAYAM Portal : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट; स्वयम पोर्टलवर आता 1247 अभ्यासक्रम शिकता येणार; ते ही मोफत!!  

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन वद्यार्थ्यांसाठी (SWAYAM Portal) एक महत्वाची अपडेट आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील उच्च शिक्षण संस्थांचे १ हजार २४७ नवीन अभ्यासक्रम ‘स्वयम पोर्टलद्वारे’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. तर या अभ्यासक्रमांची परीक्षा मे २०२४ मध्ये घेतली जाणार आहे; अशी माहिती युजीसीने एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा
उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वयम मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी तब्बल १ हजार २४७ अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. स्वयम पोर्टलवरील अभ्यासक्रमांचा फायदा नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्यासाठी आणि त्यांचे क्रेडिट ट्रान्स्फर करण्यासाठी होणार आहे.
या अंतर्गत यूजीसीने बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन या विषयावर चार अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे नवे अभ्यासक्रम शैक्षणिक विभागप्रमुख आणि अधिष्ठात्यांनी संबंधित अधिकार मंडळासमोर मांडून क्रेडिट हस्तांतरणासाठी उपलब्ध करण्याची सूचना यूजीसीच्यावतीने करण्यात आली आहे.

‘या’ विद्यापीठांचा आहे समावेश
सर्व अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट निश्चित करण्यात आले आहेत. देशातील (SWAYAM Portal) तसेच जगभरातील विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करून अभ्यास करु शकतात. नव्या १,२४७ अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा उच्च शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकता येणार आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८, १९, २५ आणि २६ मे रोजी होणार आहे; असे युजीसीने जाहीर केले आहे. या सर्व अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आदींची माहिती स्वयमच्या www.swayam.gov.in/UGC पोर्टलवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com