Career Success Story : सरकारी शाळेत शिकला.. 35 कंपन्यांनी रिजेक्ट केलं; तरीही मिळवलं करोडोचं पॅकेज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । काम करत असताना देखील (Career Success Story) तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं; असं अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून सिध्द केलं आहे. मनू अग्रवाल ही त्यापैकीच एक आहे. तो उत्तर प्रदेशच्या झाशीचा रहिवासी आहे. त्याने काम करत असतानाही यश मिळवून दाखवलं आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले. 10 हजार  रुपयांपासून त्याने नोकरीला सुरुवात केली. चांगल्या संधींचा शोध घेत, 1 कोटींहून अधिक पगाराचे पॅकेज मिळवण्यात तो यशस्वी झाला. तो ट्यूटोर्ट अकादमीचा सह-संस्थापक देखील आहे. ही अकादमी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा स्ट्रक्चर आणि फुल स्टॅकमधील मास्टर कोर्ससाठी ओळखली जाते. आज आपण मनू अग्रवाल या तरुणाचा प्रवास पाहणार आहोत….

सरकारी शाळेत शिकला
मनू अग्रवाल हा एक सामान्य कुटुंबातील तरुण आहे. त्याचे शिक्षण हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. शिकत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गणित विषय त्याच्यासाठी अवघड होता. पण तो हरला नाही. त्याने आपल्यातील कमकुवतपणाचा धैर्याने सामना करण्याचा निर्धार केला. AIEEE परीक्षेत त्याने उत्कृष्ट रँक मिळवली. यामुळे त्याला BCA (Bachelor of Computer Application) करण्याचा मार्ग मोकळा झाला.

35 कंपन्यांनी नाकारलं
घरातील आर्थिक अडचणीचा सामना करत मनूचा प्रवास सुरु होता.  2016 मध्ये त्याला 10,000 रुपयांची पेड इंटर्नशिप मिळाली. बीसीएनंतर एमसीए करत असताना अनेक कंपन्यांमध्ये त्याने नोकरीसाठी अर्ज केला. पण दुर्दैव पाठ सोडत नव्हते. त्याला एकामागोमाग एक सुमारे 35 कंपन्यांनी नाकारले होते. पण तो खचला नाही. नोकरी मिळवायची आणि ती ही चांगल्या पगाराच्या पॅकेजचीच; असा मणूने निर्धार केला होता. नोकरी शोधतच राहणार यावर मनू ठाम होता. आपल्याला भारतात यश मिळाले नाही; तर परदेशात नोकरी शोधण्यासाठी जायचं; असा त्याने मनाशी ठाम निश्चय केला.  त्याने परदेशात नोकरीसाठी अर्जही करण्यास सुरुवात केली.

कोटीत मिळाले पॅकेज
मनू अग्रवालकडे अपवादात्मक कोडिंग कौशल्य होते. याचा (Career Success Story) त्याला फायदा झाला. त्याला मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप मिळाली. त्यानंतर त्याला नोकरीची ऑफरही देण्यात आली. मायक्रोसॉफ्टने त्याला अमेरिकेतील सिएटल येथे १.९ कोटी रुपये पगाराचे पॅकेज देऊ केले. त्यानंतर तो तिथे काम करू लागला.
कोरोना काळात मायदेशी परतला (Career Success Story)
कोरोना काळात सगळीकडेच लॉकडाऊन होते. मनू परदेशी होता; पण कुटुंबाच्या आरोग्याच्या चिंतेमुळे त्याला  भारतात परतावे लागले. इथे आल्यानंतर त्याचे प्राधान्यक्रम बदलले. कोविड-19 महामारीच्या काळात त्याने आपल्या कुटुंबासोबत रहावे; अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. भारतात परतल्यानंतर तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून गुगलमध्ये रुजू झाला.  मग त्याचा मित्र अभिषेक गुप्तासोबत ट्यूटोर्ट अकादमीमध्ये सह-संस्थापक म्हणून सामील होण्याचा निर्णय त्याने घेतला. ही अकादमी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा स्ट्रक्चर आणि फुल स्टॅकमधील मास्टर कोर्ससाठी ओळखली जाते.

काय करते ट्यूटोर्ट अकादमी
मनु अग्रवालच्या देखरेखीखाली, ट्यूटोर्ट अकादमी करिअरच्या वाढीसाठी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखत आहे.  करिअरमधील प्रगती असो किंवा  व्यवसायाचा (Career Success Story) विस्तार असो, चांगले सामुदायिक शिक्षण असो किंवा विकसित तंत्रज्ञानाची गतिशीलता समजून घेणे असो, त्यांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात.
अकादमीच्या कार्यक्रमात उद्योग तज्ञांचे प्रशिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन, प्रोफाइल पुनरावलोकन, प्लेसमेंट सहाय्य, यासह  दोन वर्षांचा पास आणि सानुकूल पेमेंट पर्याय यांचा समावेश आहे. लाइव्ह-ऑनलाइन क्लासेसचा अवलंब करून, Tutort Academy विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने नोकरीसाठी तयार कौशल्ये आत्मसात करण्यास सक्षम करते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सोयीस्कर होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com