ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून; पाच संवर्गासाठी होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद भरतीचा (ZP Recruitment 2023) तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून ही भरती परीक्षा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत.

राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरु केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हजारो पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील सुमारे 1972 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि.7 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात लेखा वरिष्ठ सहायक, दोरखंडवाला, कृषी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी लघुलेखक, लेखा कनिष्ठ सहायक या पदांसाठी परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेचा दुसरा टप्पाही पार पडला. आता तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ पदांसाठी होणार परीक्षा (ZP Recruitment 2023)
भरतीच्या तिसऱ्या टप्प्यात दि. 1 नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. तर दि. 2 नोव्हेंबरला शिक्षण विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी परीक्षा होत आहेत. सातारा जिल्ह्यात यासाठी सातारा शहरात दोन आणि कराड येथे एक परीक्षा केंद्र आहे. तसेच या परीक्षेसाठी राज्यातील कोणताही उमेदवार पसंदी दिलेल्या जिल्ह्यात जाऊन तेथील केंद्रावर जिल्हा परिषदेच्या पदासाठी भरती परीक्षा देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com