Earn and Learn : विद्यार्थ्यांनो…. शिकता शिकता पैसे कमवा.. करा ‘हे’ 5 व्यवसाय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक होतकरु मुलांना शिक्षण घेत असताना (Earn and Learn) पैशांची कमतरता भासते. सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती एक सारखी नसते. काही विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मुबलक पैसे पुरवू शकतात पण काही पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करता येत नाहीत. याला कारणीभूत असते त्यांच्या घरची बिकट आर्थिक परिस्थिती. अनेक मुलांना शिक्षणासाठी फी भरण्यासाठी वेळेवर पैसे मिळत नाहीत.  परिणामी खचलेल्या मानसिक स्थितीमध्ये ही मुळे वावरत असतात. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. काही प्रसंगात मुलांना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागते. अशावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो. तुम्हाला माहित आहे का; विद्यार्थीदशेत असतानाच तुम्ही काही ना काही काम करुन पैसे कमावू शकता. आज आम्ही याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतः कमाई करुन तुमच्या शिक्षणाचा खर्च करू शकता शिवाय तुमच्या घरासाठी देखील थोडीफार आर्थिक मदत करू शकता.

शिक्षणामध्ये खंड पडू द्यायचा नसेल; शिवाय स्वतःचा खर्च स्वतःला करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत. तुमचे शिक्षण सुरु असताना तुम्ही हे व्यवसाय अगदी सहजपणे सुरू करू शकता आणि पैसेही कमवू शकता.
प्लेसमेंटद्वारे होईल कमाई
तुम्ही प्लेसमेंट एजन्सीद्वारे देखील कमाई (Earn and Learn) करू शकता. तुम्ही प्लेसमेंट एजन्सीद्वारे तुम्ही विविध ठिकणी कर्मचारी नियुक्त करू शकता. आजकाल अनेक लोक याकामातून मोठी कमाई करत आहेत.

शिकवणी (Tution) 
तुमच्याकडे शिकवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही घरीच शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेवू शकता. एखाद्या विषयावर तुमचे चांगले प्रभुत्व  असेल तर तुम्ही मुलांना चांगले शिकवू शकता. यासाठी तुम्हाला ट्यूशन फीच्या स्वरूपात महिन्याला चांगले  पैसे मिळवता येतील.
भाषांतरकार बनून करू शकता कमाई (Earn and Learn)
तुमचे भाषांतर करण्यात  कौशल्य असेल तर तुम्ही भाषांतरकार म्हणून काम करू शकता. यासाठी तुम्हाला माराठीसाह हिंदी आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असले पाहिजे. विद्यार्थीदशेतच तुम्ही विविध प्रकारचे लेख भाषांतर करुन पैसे मिळवू शकता.

यूट्यूब चॅनल (YouTube)
तुम्ही YouTube वर विविध विषयांवर व्हिडिओ अपलोड करूनही पैसे कमवू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाशी संबंधित व्हिडिओ अपलोड (Earn and Learn) करू शकता. तसेच तुम्ही घरापासून दूर अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ बनवून ते YouTube वर आपलोड करुन पैसे कमवू शकता. तुमचे YouTubeचॅनेल तुम्हाला चांगली कमाई करुन देईल.
कंटेन्ट रायटिंग (Content Writing)
जर तुम्हाला लेखन करण्याची आवड असेल आणि तुम्ही कोणत्याही विषयावर चांगले लिहू शकत असाल तर तुम्ही कंटेन्ट रायटिंग करुन त्या बदल्यात पैसे मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com