MPSC Success Story : वडिलांची इच्छा होती प्राध्यापक व्हावं; पण तिने MPSC देवून कमालच केली; संसार सांभाळत तीन वेळा झाली अधिकारी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । लग्नानंतर मुलीला माहेरचे तिचे (MPSC Success Story) उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पाठिंबा देतातच पण जर माहेरच्या लोकांप्रमाणे सासरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला तर मुलगी खूप काही करु शकते. ऐश्वर्याच्या बाबतीत हे सिध्द झालं आहे. ऐश्वर्या नाईक–डुबल हिने एकदा नव्हे; तर तीनवेळा अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
ऐश्वर्याही करवीर तालुक्यातील हळदी गावची रहिवासी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिची विविध पदांवर तीनदा निवड झाली आहे. मुली लग्न झालं की संसाराच्या रहाटगाड्यात अडकतात आणि आपलं अस्तित्व हरवून जातात. पण ऐश्वर्याच्या बाबतीत असं घडलं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून तिला अधिकारी बनायचं होतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची तिची जिद्द होती. या जिद्दीला तिच्या माहेरच्या बरोबरच सासरचाही पाठिंबा मिळाला आणि २०२१ च्या राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निकालात ऐश्वर्याची अधिकारी पदावर वर्णी लागली. ऐश्वर्या सध्या नोकरी निमित्त सांगली येथे वास्तव्यास आहे.

ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक आहेत तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच तिच्या घरात खेळाचे वातावरण असल्याने ती एक राष्ट्रीय पातळीवर खेळणारी उत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स व स्विमिंगमधील खेळाडू आहे .ऐश्वर्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत पुर्ण केले आणि पुढे कोल्हापूरातील (MPSC Success Story) पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. लहानपणापासूनच शालेय जीवनात ती हुशार होती शिवाय उत्कृष्ट खेळाडू देखील होती.

ग्रॅज्युएशन करत असताना केली MPSC ची तयारी (MPSC Success Story)
ऐश्वर्याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने SET परीक्षा देवून प्राध्यापक व्हावे; पण तिचं ध्येय वेगळंच होतं. ऐश्वर्याला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा होती त्यामुळे तिने पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र कोरोना काळात परिक्षांना विलंब झाल्यामुळे मधल्या काळात तिने अर्थशास्त्र विषयातून सेट (SET) परिक्षा दिली आणि ती टामध्ये पास देखील झाली. पण अधिकारी होण्याचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. जाहिरात निघल्यानंतर तिने MPSC चा फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. या परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ऐश्वर्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली तर दुसऱ्या प्रयत्नात उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली.x

सलग तीनवेळा झाली अधिकारी
ऐश्वर्याचे लग्न झाले होते. पण तिने संसार सांभाळत अभ्यास सुरूच ठेवला होता. ती घेत असलेल्या कष्टाला तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांची जोड मिळाली. तिने घेतलेल्या प्रयत्नांना (MPSC Success Story) यश मिळालं आणि तिची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली. ऐश्वर्याचे पती संग्राम डुबल हे सुध्दा मंत्रालय कक्ष अधिकारी आहेत. तर, सासरे उदयराव डुबल हे डीवायएसपी आहेत. घरातच करिअरच्या बाबतीत सुदृढ वातावरण असल्याने तिला सतत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. 2 वेळा अधिकारी पद मिळाल्यानंतरही तिने पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्या वेळेस तिची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे. ती सध्या सांगली येथे कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com