MPSC Recruitment 2023 : MPSC ‘गट क’ अंतर्गत 7510 पदांच्या भरतीची जाहिरात निघाली; लवकरात लवकर करा अर्ज 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । MPSC कडून भरती जाहीर होण्याची (MPSC Recruitment 2023) राज्यातील तरुण उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी पार पडणार आहे. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी दि. 31  ऑक्टोबर च्या आत अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या ७५१० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी खलाई दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२३
पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
पद संख्या – 7510 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १७ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी – (MPSC Recruitment 2023)
1. अमागास – रु. 544/-
2. मागासवर्गीय- रु.344/-
3. माजी सैनिक – रु.44/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग (MPSC Recruitment 2023) किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

 

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com