करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा कोणत्या आहेत?
उत्तर- संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंग्रजी, फ्रेंच, अरबी, चिनी, रशियन आणि स्पॅनिश या सहा अधिकृत भाषा आहेत.
प्रश्न 2 – आपल्या शरीराच्या कोणत्या भागात आयोडीन साठवले जाते?
उत्तर – आयोडीन आपल्या शरीरातील थायरॉईड ग्रंथीमध्ये साठवले जाते.
प्रश्न 3 – आपल्या शरीराच्या कोणत्या भागात सर्वात सक्रिय स्नायू आहेत?
उत्तर – आपल्या शरीरातील डोळ्याचे स्नायू सर्वात सक्रिय असतात.
प्रश्न 4 – कोणत्या ठिकाणी पाळीव कुत्रा पाळणे कायद्याच्या विरोधात आहे?
उत्तर- आईसलँडमध्ये कुत्रा पाळणे कायद्याच्या विरोधात आहे.
प्रश्न 5 – कोणता प्राणी आणि मानवी शरीराची हाडे समान आहेत?
उत्तर – मनुष्य व जिराफ यांच्या शरीरात समान हाडे असतात.
प्रश्न 6 – कोणता प्राणी जन्मानंतर बाळासारखा रडतो?
उत्तर – अस्वल जन्मानंतर बाळासारखे रडते.
प्रश्न 7 – जगातील सर्वात लांब नदी कोणती? (GK Updates)
उत्तर – जगातील सर्वात लांब नदी म्हणजे नाईल नदी.
प्रश्न 8 – एका मिनिटात हत्तीचे हृदय सरासरी किती वेळा धडधडते?
उत्तर- एका मिनिटात हत्तीचे हृदय सरासरी ३०० वेळा धडधडते.
प्रश्न 9 – सोन्याची शुद्धता (GK Updates) कोणत्या प्रमाणात परिभाषित केली आहे?
उत्तर- सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये परिभाषित केली जाते.
प्रश्न 10 – भारतातील कोणत्या राज्याला ‘मंदिरांची पवित्र भूमी’ म्हणतात?
उत्तर- तामिळनाडूला ‘मंदिरांची पवित्र भूमी’ म्हटले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com