टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या अंतिम स्पर्धकांमध्ये त्यांची निवड झाली होती. सौंदर्य आणि हुशारी अशा दोन्ही गुणांनी समृद्ध ऐश्वर्या श्योरान यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांनी ९३ वा रँक पटकाविला आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थी असणाऱ्या ऐश्वर्या यांनी केवळ कठोर परिश्रम, जिद्द आणि इच्छाशक्ती यांच्या बळावर हे यश मिळविले आहे. माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय यांच्या नावावरून माझे नाव ऐश्वर्या ठेवण्यात आले होते असे त्या सांगतात. आईची ईच्छा होती की मुलीने मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात नाव करावे. आईच्या इच्छेसाठी मिस इंडिया पर्यंत गेले मात्र मला नेहमीच प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. असे त्या म्हणाल्या. म्हणूनच मॉडेलिंग क्षेत्रातून थोडा ब्रेक घेऊन त्यांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यास करायला सुरुवात केली. हा मार्ग सोपा नव्हता मात्र त्यांनी मेहनतीने हे यश मिळविले आहे.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या ऐश्वर्या यांनी कोणता क्लास लावला नाही. अभ्यास करत असताना सोशल मीडियापासून दूर राहणे, फोन स्विच ऑफ ठेवणे अशा काही उक्तीचा त्यांनी अवलंब केला. तसेच लहानपणापासून अभ्यासाची सवय असल्याचा फायदा त्यांना यावेळी झाला. त्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थी होत्या मात्र नंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यांचे वडील अजय कुमार एनसीसी तेलंगणा बटालियन चे कमांडिंग ऑफिसर आहेत. मॉडेलिंग मधून थेट प्रशासकीय सेवेत आल्यामुळे त्यांचे ट्विटरवर अनेकजण अभिनंदन आणि कौतुक करत आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com