Success Story : रात्रं-दिवस काम करून केला अभ्यास; उच्च शिक्षण घेऊन रेल्वेत मिळवली नोकरी!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात एखाद्याला किती संघर्ष (Success Story) सोसावा लागतो याची आपण कल्पना करू शकत नाही. मनातील जिद्द अडचणींवर मात करायला बळ देते. अभ्यास सांभाळत केलेली नोकरी; नोकरीत मिळालेल्या उत्पन्नातून घर खर्च भागवून पुन्हा घेतलेलं शिक्षण… वेळप्रसंगी केलेली सफाई आणि वॉचमनची कामे; एवढा संघर्ष करत या तरुणाने कष्टाचं चीज केलं आहे; अनेक आव्हाने पेलत त्याने उच्च शिक्षण तर घेतलच पण पहिल्याच प्रयत्नात पास होत त्याने रेल्वेत नोकरी मिळवली आहे.

घर विकावे लागले
प्रणीत घायाळकर हा कुमठे (सोलापूर) येथील रहिवासी. कोरोना काळात संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले. घर विकल्याने कोणताच आधार राहिला नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आईने सेल्‍समनचे काम सुरू केले. वडील देखील बाहेर कामावर जाऊ लागले. प्रणीतही शांत बसला नाही. एका अपार्टमेंटमध्ये त्याला वॉचमनचे काम मिळाले. नोकरीसोबत  राहण्यासाठी एक रूम देखील मिळाली; त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्नही मिटला.

शिकण्यासाठी संघर्ष (Success Story)
प्रणीत वॉचमनची नोकरी करत असताना अपार्टमेंटमध्ये साफसफाईची कामे तसेच चारचाकी गाड्यांची स्वच्छता करायचा. या कामाच्या मोबदल्यात त्याला जादाचे पैसे मिळू लागले. रोज ही कामे करून प्रणीत अपार्टमेंटच्या व्हरांड्यात अभ्यास करत असे. इथेच त्याचे अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. नंतर त्याने डिझेल मेकॅनिक ट्रेडचा आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.यानंतर त्याला टाटा मोटर्समध्ये काही महिन्यासाठी काम मिळाले. या कामाच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून त्याने पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळवला.

एज्युकेशन लोन घेतले
पुन्हा पैसे संपल्याने प्रणीतने एज्युकेशन लोन काढून पुढील (Success Story) शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. अपार्टमेंटमध्ये नियमितपणे सफाई व इतर कामे तो करतच होता. त्याचबरोबर त्याचे अभ्यासाकडे लक्ष होते.
त्याला पुन्हा टाटा मोटार्स व झुआरी सिमेंटमध्ये काम मिळाले. या नोकरीचे पैसे मिळाल्यावर त्याने व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात पार्ट टाइम बी.टेक.चे शिक्षण सुरु केले. शिक्षणासोबत त्याने आता रात्रपाळीचे काम व दिवसात अपार्टमेंटचे काम, अशी तीन कामे एकाचवेळी सुरू ठेवली.
अनामिक व्यक्तीने फी भरली
रेल्वेच्या भरतीसाठी त्याने अर्ज केला. या परीक्षेचे क्लासेस लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण कोणीतरी नाव न सांगता प्रणीतची क्लासची फी भरली. तो पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण झाला. पण कोरोनामुळे भरती प्रक्रिया लांबली.

रेल्वेत मिळाली नोकरी
भरती प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्यानंतर प्रणीतला रेल्वेचा कॉल आला. रेल्वेकडून भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळाली. प्रणितकडे पुरेसे पैसे येवू लागल्यानंतर त्याने आधी आई व नंतर वडिलांना त्यांचे काम थांबवण्यास सांगितले. भाऊजीने केलेल्या (Success Story) मदतीमुळे त्याने एक प्लॉट त्याने खरेदी केला. प्राणितचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. दहावी, आयटीआय, पॉलिटेक्निक व बी.टेक.पर्यंतचे सर्व शिक्षण त्याने स्वकष्टावर घेतले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com