करिअरनामा ऑनलाईन । सध्याचं युग अतिशय धावपळीचं (Career Tips) झालं आहे. उद्योग धंदा असो किंवा नोकरी; स्पर्धेच्या काळात काम करताना ताण तणावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात डोकं शांत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मूड फ्रेश असणं तितकचं महत्वाचं आहे. तरच तुम्ही परिणामकारक काम करू शकता. ऑफिसमध्ये काम करत असताना वातावरण ताज तवाणं राहावं यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स तुम्हाला निश्चितपणे उपयोगी ठरतील.
1. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी होत असलेल्या संभाषणात सहभागी व्हा. कामात अडचण असल्यास इतर सहकाऱ्यांची मदत घ्या. एकमेकांशी चर्चा केल्याने अनेक प्रश्न सुटतात.
2. ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी होत असलेल्या चर्चेत सहभागी. चर्चा केल्याने अनेक प्रश्न सुटतात. अडचण असल्यास वेळोवेळी सहकाऱ्यांची मदत घ्या.
3. झोकून देवून काम करताना स्वत: ची काळजी घेणं तितकच महत्वाचं आहे. स्वत:कडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करण्यासोबत योग्य आहार घेण्याकडे लक्ष द्या. असे केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे तुम्ही तुम्ही करत असलेल्या कामावर चांगला परिणाम होतो.
4. काम करत असताना तुम्हाला जे ध्येय साध्य करायचं आहे ते आधीच ठरवा; असं केल्याने डोळ्यासमोर निश्चित ध्येय असल्याने तिथ पर्यंत पोहचताना तुमची रणनिती ठरलेली असते; त्यामुळे काम सोपं होतं.
5. आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फार (Career Tips) महत्वाचं आहे. हा दृष्टिकोन तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची मानसिकता निर्माण करतो. अपयश आले तरी न खचता अनुभवातून शिकत रहा. मागे झालेल्या चुका सुधारा आणि पुढे जात रहा.
6. रोजच्या कामात तोचतोचपणा आल्याने कामातील उत्साह कमी होऊ शकतो. कामातील उत्साह वाढवण्यासाठी कामात विविधता शोधा. सतत शिकत राहण्याची प्रक्रिया आणि कामातील विविधता आपला उत्साह वाढवू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com