GK Updates : सूर्यावरील स्फोटांचे आवाज ऐकू का येत येत नाहीत? एकूण महासागर किती? माहित हवीत याची उत्तरे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
B. यांपैकी काहीही नाही.
C. सूर्याचे तापमान फार आहे.
उत्तर D. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही
2. भारतीय नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 15 (GK Updates)
उत्तर C. 17
D. 13
3. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
उत्तर A. महानदी
B. गोदावरी
C. गंगा
D यमूना

4. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे
A. क्रिकेट
B. फुटबॉल
उत्तर C. हॉकी
D बडमिंटन
5. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?.
A. क्लोरीन
B. ग्रॅफाईड
C. हेलियम (GK Updates)
उत्तर D. पारा
6. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
उत्तर A. 5
B. 9
C. 6
D. 4

7. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A. हैड्रोजन
B. ऑक्सिजन
C. नायट्रोजन
उत्तर D. कार्बन डाय ऑक्साईड
8. ….पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. लोह
उत्तर B. बॉक्साइट
C. मॅगनीज
D. ताब
9. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. पूर्णविरामासारखा
उत्तर B. स्वल्पविराम सारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही
10. (GK Updates) विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. अल्युमिनियम
B. नायक्रॉन
C. प्लॅटेनियम
उत्तर D. टंगस्टन
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com