GK Updates : लॉयर आणि ॲडव्होकेट…काय आहे दोघांमध्ये फरक? जाणून घ्या यांचं काम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात, देशातील (GK Updates) वाढत्या बेरोजगारीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे खूप कठीण झाले आहे. तुम्ही देखील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल, तर तुमच्यासाठी प्रत्येक माहितीबाबत अपडेट राहणे महत्त्वाचे आहे, कारण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्कीच असतात. जर आपण UPSC परीक्षेबद्दल बोललो, तर त्याच्या लेखी परीक्षेपासून मुलाखत फेरीपर्यंत सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत विशेषतः देशाच्या महत्त्वाच्या सेवेशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्याय विभाग. तुम्ही कधी न्यायालयात गेला असाल किंवा चित्रपटात पाहिले असेल की काही लोक न्यायालयात त्यांच्या क्लायंटच्या बाजूने बोलताना दिसतात. या लोकांना वकील म्हणतात. काळा कोट आणि पांढऱ्या शर्टमध्ये वकील ओळखले जातात. परंतु बहुतेक करुन त्यांना लॉयर आणि ॲडव्होकेट म्हणून संबोधले जाते.

पण तुम्हाला हे माहित आहे का; लॉयर आणि ॲडव्होकेटमध्ये फरक आहे. जर तुम्हाला याबाबत कल्पना नसेल तर जाणून घेऊया. लॉयर आणि ॲडव्होकेट हे शब्द एकमेकांचे स्वतंत्र समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात, परंतु तरीही दोघांमध्ये काही फरक आहेत; ते पाहूया…
1. लॉयर (GK Updates) – लॉयर अनेक प्रकारचे असू शकतात; जसे की ॲटर्नी, ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर. ते सर्व कायद्याच्या विविध क्षेत्रात विशेषज्ञ आहेत. सर्व प्रथम आपण लॉयर बद्दल बोलूया. लॉयर अशा व्यक्तीला म्हणतात जो अजूनही कायद्याचा, एलएलबीचा अभ्यास करत आहे. या व्यक्तीला न्यायालयात केस लढण्याची परवानगी नाही. कारण पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय वकिलीसाठी नोंदणी करता येत नाही. मात्र, कायद्याचे शिक्षण घेतलेली कोणतीही व्यक्ती ॲडव्होकेट असावी असे नाही. कोणत्याही लॉयरचे काम एखाद्या व्यक्तीला कायदेशीर सल्ला देणे हे असू शकते, परंतु तो त्याच्या बाजूनं न्यायालयात खटला लढू शकत नाही.

2. ॲडव्होकेट – ॲडव्होकेट खरंतर एक वकिलच असतो. ही अशी व्यक्ती आहे जिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहे. ॲडव्होकेटला (GK Updates) स्कॉटिश आणि दक्षिण आफ्रिकेत बॅरिस्टर म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा घेऊ शकता. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर बॅरिस्टरची पदवी घेऊन परतले. प्रत्येक लॉयर हा ॲडव्होकेट असावा असं नाही. तर कोणती व्यक्ती कोणासाठी जर खटला लढत असेल तर ती ॲडव्होकेट असते. एक प्रकारे ते व्यावसायिक असतात. ॲडव्होकेट बनण्यासाठी कोणत्याही लॉयरला बार कौन्सिलमध्ये नोंदणी करावी लागते आणि बारची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, त्यानंतर तो ॲडव्होकेट बनतो.

ॲडव्होकेटचे काम न्यायालयात त्याच्या क्लायंटचे प्रतिनिधित्व (GK Updates) करणे आणि त्यांचा बचाव करणे हे आहे. त्याचवेळी, लॉयरचे काम कायदेशीर सल्ला देणे, कोणत्याही बाबतीत जनहित याचिका दाखल करणे हे आहे. इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रकारानुसार त्यांची भूमिकाही बदलू शकते. ॲडव्होकेट हे लॉयरच्या एक पाऊल पुढे आहेत. ॲडव्होकेटचं कार्य व कार्यक्षेत्र लॉयरपेक्षा मोठे असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com