करिअरनामा ऑनलाईन । देशात 81 वा क्रमांक (Success Story) मिळवून CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट बनलेल्या पूनम गुप्ता म्हणतात की; “मुलींसाठी कोणतंही काम अशक्य नाही, जर त्यांनी कोणतंही आव्हान मनापासून स्वीकारले आणि ध्येयाकडे वाटचाल केली, तर त्या अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवू शकतात. पुनमकडे पाहून अनेक मुलींच्या मनात देशसेवा करण्याची आणि गणवेश परिधान करण्याची भावना निर्माण झाली आहे. आज या लेखात आपण पुनमबद्दल जाणून घेणार आहोत.
नवोदय विद्यालयात नोकरी करत असलेल्या रघुवीर गुप्ता यांची कन्या पूनम गुप्ता. ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिला प्रजासत्ताक दिनी कर्तव्य मार्गावर परेडचे नेतृत्व करताना पाहून परिसरातील मुलींमध्ये गणवेश परिधान करण्याची भावना निर्माण झाली आहे. पूनम ही देशभरातून निवडलेल्या महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहे, तिला देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाखाली अभिमानाने आणि सन्मानाने परेडचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. पूनम CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट आहेत. CRPF मध्ये जाण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली याबाबत त्यांनी प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून आपले अनुभव सांगितले आहेत.
प्रश्न : देशाच्या संरक्षण दलात सहभागी होण्याचं कधी ठरवलं?
उत्तर : शिवपुरी-श्योपूर हे आमचे मूळ ठिकाण आहे. युनिफॉर्म (Success Story) घालणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. 2016 मध्ये गणितात B.Sc केले. नंतर इंग्रजीत मास्टर्स केले. यानंतर बीएड केले आणि नंतर सीडीएससाठी पात्र ठरले. तयारी करत राहिले आणि नंतर UPSC CPS मध्ये 81 वा क्रमांक मिळवला.
प्रश्न : सीआरपीएफमधील तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे?
उत्तर : वर्ष २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत CRPF प्रशिक्षण पूर्ण केले. बिहारच्या गया येथे 159 बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून पहिली पोस्टिंग. त्यानंतर चार महिने कोब्रा कमांडोचा कोर्स केला. या प्रशिक्षणामुळे देशसेवेची भावना अधिक दृढ झाली.
प्रश्न : प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व करण्याची तयारी कशी केली?
उत्तर : सप्टेंबरमध्ये विभागीय परेड झाली, मी त्याचे नेतृत्व केले. त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडची दीड महिना तयारी करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनी परेडचे नेतृत्व करण्यासाठी तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर मला त्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
प्रश्न : तुमच्यात असलेली प्रतिभा आणि आवड इतर (Success Story) मुलांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काही योजना आखली आहे का?
उत्तर : नक्कीच…जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी शाळांमधील मुलांपर्यंत पोहोचेन आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करेन. करिअर समुपदेशनासाठीही मी प्रयत्न सुरू राहणार आहेत.
प्रश्न : विद्यार्थिनींना तुमचा काय संदेश आहे?
उत्तर : फक्त एवढंच सांगू इच्छिते की आम्ही मुली कोणत्याही स्तरावर कमजोर नाही. तुम्ही गणवेश परिधान करा किंवा इतर कोणत्याही सेवा क्षेत्रात जा, तुमच्यामध्ये देशसेवेची भावना कायम राहिली पाहिजे. तुम्ही ध्येयासाठी 50% नाही तर 100% प्रयत्न केले तरच तुम्ही निश्चितपणे प्रत्येक परिस्थितीत तुमचे ध्येय साध्य करू शकता.
कोण आहे पुनम गुप्ता? (Success Story)
Assistant Commandant पुनम गुप्ता यांनी गणितात पदवी आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बीएडही केले आहे. तिचे वडील श्योपूर नवोदय विद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुनम यांनी यूपीएसई सीएसई परीक्षेची तयारी करण्याचे ध्येय ठेवले. त्यांनी 2018 मध्ये UPSC CAPF परीक्षा संपूर्ण भारतात 81 वी रॅंक मिळवून उत्तीर्ण केली. त्या सध्या बिहारमधील नक्षलग्रस्त भागात सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत आहे. पुनम गुप्ता इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असतात. महिला सक्षमीकरणासाठी त्या विविध उपक्रम राबवतात. त्यांनी राबविलेल्या अनेक मोहिमांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्याबद्दलची छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी त्या इन्स्टाग्राम हँडल वापरतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com