करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 : राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
उत्तर : २३८ सदस्य
प्रश्न 2 : भारताचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न 3 : बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण होते?
उत्तर : डॉ. नीलम रेड्डी (१९७७-१९८२)
प्रश्न 4 : पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
उत्तर : राज्य सूचीमध्ये
प्रश्न 5 : भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत?
उत्तर : ५४५ सदस्य
प्रश्न 6 : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?
उत्तर : औरंगाबाद (GK Updates)
प्रश्न 7 : भारतातील कोणत्या राज्यात सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते?
उत्तर : सिक्कीम
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com