करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1- आपल्याला दोन डोळे आहेत, मग (GK Updates) आपल्याला एकावेळी एकच गोष्ट का दिसते?
उत्तर – आपण गोष्टी डोळ्यांनी पाहत नाही तर मनाने पाहतो. प्रथम दोन्ही डोळे एकाच गोष्टीला लक्ष्य करतात, त्यानंतर त्या वस्तूचे अस्पष्ट चित्र तयार होते, त्यानंतर मेंदू ती वस्तू योग्य स्वरूपात दाखवतो.
प्रश्न 2- अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत पण इतरही वापरतात?
उत्तर – व्यक्तीचे नाव, कोणत्याही व्यक्तीचे नाव बहुतेकदा इतर लोक जास्त वापरतात.
प्रश्न 3 (GK Updates) – जगात किती धर्म आहेत?
उत्तर – हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत परंतु जगात 300 पेक्षा जास्त धर्म आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत.
प्रश्न 4- 01 वर्षात किती तास असतात?
उत्तर – 8760 तास
प्रश्न 5 – 01 महिन्यात किती तास असतात?
उत्तर – 730.01 तास
प्रश्न 6- हत्ती आपल्या सोंडेत एकावेळी (GK Updates) किती पाणी धरू शकतो?
उत्तर – 5 लिटर.
प्रश्न 7- अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?
उत्तर – तारीख
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com