GK Updates : रक्तदान करतांना शरीरातून किती रक्त काढले जाते? पहा डोकं खाजवायला लावणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ
2. संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ
3. पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)
4. पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र’ कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

5. FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
6. मानवी रक्ताची (GK Updates) चव कशी असते?
उत्तर : खारट
7. रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर (GK Updates) : 300 मि.ली.

8. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत
9. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5 वर्षा पर्यंत
10. शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com