GK Updates : वाचायलाच हवे असे सामान्य ज्ञान वाढवणारे 10 प्रश्न 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी (GK Updates)
2. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
3. राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

4. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन
5. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य
6. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

7. सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
8. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
9. (GK Updates) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
10. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com