करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडमधील चारौदा हे (Success Story) एक कमी प्रसिद्ध शहर भरत कुमार नावाच्या एका तरुण मुलाच्या उल्लेखनीय प्रवासाचा साक्षीदार आहे, ज्याची कथा त्याच्यामधील दृढनिश्चय आणि धैर्याचा पुरावा देत आहे. भरत हा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, त्याचे वडील बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्याची आई चहाचा स्टॉल सांभाळते.
शिक्षणासाठी शाळेने दिला पाठिंबा
भरतने त्याचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय चारौदा येथे पूर्ण केले. या हुशार विद्यार्थ्याला 9वी मध्ये शिकत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता तेव्हा शाळेने त्याला शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 12वीच्या परीक्षेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती ज्यामुळे त्याला देशातील प्रतिष्ठित IIT धनबादमध्ये स्थान मिळाले.
आई चालवायची चहाची गाडी (Success Story)
भरतच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या आईने चहा विकायला सुरुवात केली. भरतही आईला हातगाडीवर भांडी धुण्यापासून सर्व कामात मदत करायचा. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या आई -वडिलांना शाळेची फी भरण्यात खूप अडचणी येत होत्या. पण हार न मानता कसेबसे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान 3 मोहिमेवर काम करण्याची संधी
भरत अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना 7 व्या सत्रात त्याच्या प्रवासाला एक विलक्षण वळण मिळाले आणि त्याची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नियुक्ती झाली. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान 3 मोहिमेवर काम करण्याची संधी मिळाली.
भरतची कथा ही एका नम्र सुरुवातीपासून जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रकल्पाचा भाग होण्याचे एक उदाहरण आहे. लहान शहरांतून आलेल्या, संकटांवर मात करुन (Success Story) आणि भारताला उज्वल भविष्याकडे नेत मोठे बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणांसाठी भरत चे उदाहरण प्रेरणादायी ठरले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com